Wednesday 30 May 2018

मुंबई: पालघरात बहुजन विकास आघाडी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता

मुंबई- राज्यात भंडारा आणि पालघर येथे येत्या २८ मे रोजी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (१४ मे) शेवटचा दिवस अाहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी (बविआ) ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
तसे झाल्यास शिवसेनेची पालघर मधली सर्व गणिते विस्कटण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच वनगा यांच्या कुटुंबीयानी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना लोकसभा पोटनिवडणुकीतही उतरवले. त्यामुळे भाजपाने घाईघाईत काँग्रेसमधून पक्षात दाखल झालेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली.बहुजन विकास आघाडीनेही या निवडणुकीत आपले पूर्वीचेच खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे दामोदर शिंगडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई: पालघरात बहुजन विकास आघाडी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता