Wednesday 30 May 2018

फिकी पडली माधुरीची जादू! कमाईत 'सैराट'सह या फिल्म्सच्या मागे पडला 'Bucket List'

फिकी पडली माधुरीची जादू! कमाईत 'सैराट'सह या फिल्म्सच्या मागे पडला 'Bucket List'
25 मे रोजी रिलीज झालेल्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून बॉलिवूडची मोहिनी अर्थातच अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. माधुरीच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 96 लाखांची कमाई केली. तर शनिवारी आणि रविवारी कमाईत वाढ झालेली दिसली. या दोन दिवशी चित्रपटाने अनुक्रमे 1 कोटी 30 लाख आणि 1 कोटी 40 लाखांची कमाई केली. तीन दिवसांत या चित्रपटाने एकुण 3 कोटी 66 




लाखांचा गल्ला जमवला. एकुण 409 स्क्रिन्सवर बकेट लिस्ट हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.

तसं पाहता, एवढी कमाई करुन बकेट लिस्ट यावर्षी चांगली ओपनिंग करणारा चित्रपट ठरला.पण माधुरीचे नवे रंग मराठीतील सैराट, लय भारी, टाइमपास या चित्रपटांपुढे फिके पडल्याचे दिसत आहे. कारण तीन दिवसांच्या कमाईविषयी बोलायचे झाल्यास सैराट, नटसम्राटसमोर माधुरीच्या चित्रपटाची कमाई कमी झाली आहे.
एक नजर टाकुया, कोणकोणत्या मराठी चित्रपटांनी कमाई 'बकेट लिस्ट'ला टाकले मागे..
'सैराट'ची तीन दिवसांची कमाई होती 12 कोटी
29 एप्रिल 2016 रोजी रिलीज झालेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट या चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसांतच तब्बल 12 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3 कोटी 60 लाखांची कमाई केली होती. तर दुस-या दिवशी हा आकडा 3 कोटी 95 लाखांच्या घरात होता. तर तिस-या दिवशी या चित्रपटाने तब्बल 4 कोटी 55 लाखांची कमाई केली होती. खरं तहर सैराटला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही रिपीट ऑडिअन्स असल्यामुळे ही कामगिरी करता आली होती. 'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करुन मराठी चित्रपटांच्या इतिहासात विक्रम रचला.

कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, वर्षा अखेरपर्यंत टीव्हीवर करणार नाही Comeback



मुंबई :सुनील ग्रोवरसोबत भांडण केल्यानंतर कपिल शर्मा काहीना काही कारणांमुळे वादात अडकतोय. आता त्याच्यासाठी अजून एक वाईट बातमी आहे. तो कमबॅक करणार असे वृत्त होते. परंतू या सर्व अफवा होत्या. सोर्सेसनुसार, सध्या कपिलच्या कमबॅकची काहीच अपेक्षा नाही. कारण तो या वर्षाच्या अखेरपर्यंत सोनी टीव्हीवर दिसणार नाही.

सोनी टीव्हीवर पहिलेच अनेक रिअॅलिटी शो सुरु आहेत. यामध्ये दस का दम सीजन 3, इंडियन आयडल सीजन 10, कोण बनेगा करोडपती सीजन 10 आणि कॉमेडी सर्कस सारख्या शोजचा समावेश आहे. पुढच्या 6 महिन्यांच्या हिशोबाने या चॅनलने पहिलेच या शोजला स्लॉट दिला आहे. यासोबतच 'सुपर डान्सर' या डान्स शोची प्रसिध्दी पाहता, चॅनल याच्या पुढच्या सीजनची तयारी करत आहे. यामुळे कपिल शर्माच्या शोसाठी स्लॉट नाही. आता त्याला 2019 पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.

आम्हाला कपिलवर पुर्ण विश्वास
सोनी चॅनलचे बिझनेस हेड दानिश खानने माध्यमांशी बोलताना कपिलविषयी सांगितले की - काही एपिसोड केल्यानंतर कपिल शर्माची तब्येत दुर्दैवाने बिघडली. याच कारणामुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला. सोनी चॅनलला कपिलच्या कामावर पुर्ण विश्वास आहे. कपिल जेव्हा फिजिकली आणि मेंटली पुर्णपणे फिट होईल. तेव्हा चॅनल त्याच्यासोबत काम करेल.
कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, वर्षा अखेरपर्यंत टीव्हीवर करणार नाही Comeback

रोजा संदर्भात अनेकांच्या मनात आहेत हे गैरसमज, जाणून घ्या काय आहे सत्य

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास गुरुवार (दि.17)पासून प्रारंभ झाला आहे. इस्लाम धर्मात पवित्र 'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात. परंतु रोजे ठेवण्याच्या संदर्भात अनेकांच्या मनात काही गैरसमज आहेत. उदा, या महिन्यात शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत, मुलींना पीरियड्स काळात रोजे माफ असतात इ आणि इतरही गैरसमज आहेत. या संदर्भातील विशेष माहिती लखनऊ शहरातील काझी खालिद रशीद यांनी दिली आहे.
रोजा संदर्भात अनेकांच्या मनात आहेत हे गैरसमज, जाणून घ्या काय आहे सत्य

पत्नीने विदेशी girlfriend सोबत पकडले, तर म्हणाला- -'आम्ही फक्त फ्रेंड, हवे तर मेडिकल चेकअप कर'

पत्नीने विदेशी girlfriend सोबत पकडले, तर म्हणाला- -'आम्ही फक्त फ्रेंड, हवे तर मेडिकल चेकअप कर'
अहमदाबाद, गुजरात - शहराच्या शिवरंजनी परिसरात एका महिलेने बिझनेसमन पतीला विदेशी तरुणीसोबत प्रणयक्रीडा करताना पकडले. तथापि, पतीने असे काही घडल्याचे नाकारले आहे. पत्नीचा आरोप आहे की पतीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलेली तरुणी थायलंडची आहे. पत्नीचा दावा आहे की तिचा पती मागच्या 4 महिन्यांपासून तरुणीसोबत आहे. महिलेने 12 तासांत पतीला 2 वेळा विदेशी तरुणीसोबत पकडले. तथापि, पत्नीने पोलिसांत अद्याप FIR दाखल केली नव्हती.
- सूत्रांनुसार, हे प्रकरण अहमदाबादच्या शिवरंजनी परिसरातील साथ-संगाथ सोसायटीतील आहे.
- महिलेने पतीला विदेशी तरुणीसोबत रंगेहाथ पकडले. पकडल्यावर पती म्हणाला, 'ही माझी फ्रेंड आहे. पत्नीला माझ्या कुटुंबासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. मलाही दूर राहण्यासाठी सांगते. मला घरच्यांसोबत राहायचे आहे. यामुळे ती मला त्रास देते. जेव्हा मी फ्रेश होण्यासाठी गेलो, तेव्हा माझी पत्नी फ्लॅटवर पोहोचली. मी तर तिला एवढेही म्हणालो की, माझे पाहिजे तर मेडिकल चेकअप करून घे, सत्य काय ते समोर येईल.'
महिला म्हणाली, 'मी मागच्या 4 महिन्यांपासून वेगळी राहतेय. पती दररोज दारू प्राशन करून मारहाण करतो. त्याचे इतर महिलांशी संबंध आहेत. गतरात्री मी फ्लॅटवर सामान घेण्यासाठी गेलो होतो, पाहिले तर पती विदेशी तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. मी गुपचूप तेथून निघून आले. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा मी सोसायटीच्या चेअरमनशी बोलले. मला कळले की, ती तरुणी अजूनही फ्लॅटमध्येच आहे. मग मी पुन्हा फ्लॅटवर गेले, पाहिले तेव्हा तरुणी अर्धनग्नावस्थेत होती. यानंतर मी पोलिसांना बोलावले.'
- तथापि, महिलेने पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नाही. परंतु ती पतीचे मेडिकल चेकअप करण्यासाठी तयार आहे.



 

कमी वयातील प्रेमींच्या प्रेमाचा करुण अंत, फाशी घेण्यापूर्वी त्या दोघांनी काढली सेल्फी

सूरत - ती किशोरवयीन तरुणी दहावीमध्ये शिकत होती आणि 11 वीतील एका तरुणावर तिचे प्रेम जडले होते. दोघे एकाच भागात राहत होते. पण वस्ती वेगवेगळी होती. त्यांच्या प्रेमाला फार मोठा काळही लोटला नव्हता पण त्या दोघांनी एका झाडाला फाशी घेत स्वत:चे जीवन संपवले. मरण्यापूर्वी दोघांनी एक सेल्फी घेतली आणि व्हॉट्सअपवर टाकली.

घरून पळून गेली होती तरुणी
व्यारा तापी जिल्ह्यातील डोलवणमध्ये तरुणी आधी मैत्रिणींबरोबर पेलाडवाणीहून तिच्या मामाच्या घरी अंधारवाडीला गेली. त्याठिकाणाहून ती 20 मे रोजी तिचा प्रियकर कौशल कुमार चौधरीबरोबर बाइकवर कुठेतरी निघून गेली. खूप वेळ ती परतली नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्याची सूचना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. त्यानंतर 23 मे रोजी बामणामाल गावाजवळ दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनी आत्महत्येसाठी नायलॉनच्या दोरीचा वापर केला.

मरण्यापूर्वी घेतली सेल्फी
दोघांनी सुसाइडपूर्वी एक सेल्फी घेतली आणि ती व्हॉट्सअपवर टाकली. हा फोटो व्हाट्सअपवर पाहिल्यानंतर त्यांच्या ओळखीच्या लोकांना याबाब समजले. घटनास्थळी दोघांच्या चपला आणि बाइकही आढळली.

3 दिवस लटकत होते मृतदेह
दोघे 20 मे रोजी बेपत्ता झाले होते. 23 मे रोजी त्यांचे मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांनी असा अंदाज लावला की 3 दिवस त्यांचे मृतदेह लटकत राहिले असावे. पोलिसांना अद्याप दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.

क्रेडिट कार्डाचा वापर करताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी

नवी दिल्ली-अनेकदा असे होते की आपल्याला पैशाची गरज असते पण आपल्या बॅंक खात्यावर तेवढे पैसे नसतात. अशावेळी क्रेडिट कार्ड आपल्या उपयोगी पडते. याद्वारे तुम्ही गरजेच्या वेळी पैसे वापरु शकता. नंतर ठरलेल्या वेळेपुर्वी तुम्ही पैसे परत करता. आता क्रेडिट कार्डाचा वापर वाढू लागला आहे. अशा वेळी काही बाकी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
कोणतेही काम पहिल्यांदा करताना आपल्या मनात काहीशी भिती असते आणि आपली चूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. क्रेडिट कार्डलाही ही बाब लागू होते. त्यामुळेच क्रेडिट कार्डाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

क्रेडिट इनफॉरमेशन कंपनी सिबिलचे चीफचे ऑपरेटिंग ऑफिसर हर्षाला चंडोरकर याबाबतची माहिती देत आहेत.

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

बुधवार (30 मे २018) अधिक मासातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी सूर्योदय ज्येष्ठा नक्षत्रामध्ये होईल. हे नक्षत्र दिवसभर राहील. बुधवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. या योगाच्या प्रभावाने कामे वेळेवर पूर्ण होतील. बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो.