Wednesday 30 May 2018

क्रेडिट कार्डाचा वापर करताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी

नवी दिल्ली-अनेकदा असे होते की आपल्याला पैशाची गरज असते पण आपल्या बॅंक खात्यावर तेवढे पैसे नसतात. अशावेळी क्रेडिट कार्ड आपल्या उपयोगी पडते. याद्वारे तुम्ही गरजेच्या वेळी पैसे वापरु शकता. नंतर ठरलेल्या वेळेपुर्वी तुम्ही पैसे परत करता. आता क्रेडिट कार्डाचा वापर वाढू लागला आहे. अशा वेळी काही बाकी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
कोणतेही काम पहिल्यांदा करताना आपल्या मनात काहीशी भिती असते आणि आपली चूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. क्रेडिट कार्डलाही ही बाब लागू होते. त्यामुळेच क्रेडिट कार्डाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

क्रेडिट इनफॉरमेशन कंपनी सिबिलचे चीफचे ऑपरेटिंग ऑफिसर हर्षाला चंडोरकर याबाबतची माहिती देत आहेत.