Wednesday 30 May 2018

कालीबाटा येथे शहीदांना वाहिली श्रद्धांजली

जकार्ता - तीन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पोहोचले आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही देशांचे नेते कालीबाटा स्मारकावर गेले, येथे त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची शिष्टमंडळ चर्चेला सुरुवात झाली. यात सागरी मार्ग, व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा होईल. दोन्ही नेते सीईओ बिझनेस फोरमच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर मोदी मलेशिया आणि सिंगापूरला जातील.
मोदींची इंडोनेशियांच्या राष्ट्रपतींसोबत पतंगबाजी, कालीबाटा येथे शहीदांना वाहिली श्रद्धांजली