Wednesday 30 May 2018

तुतिकोरीन गोळीबारावरून विधानसभेत गदारोळ

चेन्नई/तुतिकोरीन- तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी तुतिकोरीनमध्ये स्टरलाइट कॉपर युनिटच्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिस गोळीबाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. या गदारोळातच मुख्यमंत्री पलानीसामी यांनी सभागृहात एक अहवाल सादर केला. ते म्हणाले की, जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अश्रुधूर आणि लाठीमार यांसारखे उपाय केले. ‘अपरिहार्य स्थितीत’ पोलिसांना गोळीबार करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी कॉपर युनिट बंद करण्याचा सरकारचा आदेश म्हणजे धूळफेक करणारे पाऊल असल्याची टीका केली. सरकारला विरोध दर्शवण्यासाठी स्टॅलिन यांच्यासहित द्रमुकचे सर्व आमदार काळे कपडे घालून सभागृहात आले होते. राज्य सरकारने लोकांवर दडपशाही केली, असा आरोप करत द्रमुकने सभात्यागही केला.
तुतिकोरीन गोळीबारावरून विधानसभेत गदारोळ