Wednesday 30 May 2018

2 वर्षानंतर प्रथमच शांततेसाठी पाकिस्तानचा पुढाकार, भारताने दिली मंजूरी

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कराराचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला होता, मात्र पाकिस्तानकडून त्याचे वारंवार उल्लंघन होत आले आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्यात हॉटलाइनवर चर्चा झाली, यावेळी पाकिस्तानकडून देण्यात आलेला शांततेचा प्रस्ताव भारताने स्वीकारला आहे. 29 सप्टेंबर 2016 ला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ही पहिलीच वेळ आहे की दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचे पालन करण्यावर एकमत दर्शवले आहे.
Surgical Strikeच्या 2 वर्षानंतर प्रथमच शांततेसाठी पाकिस्तानचा पुढाकार, भारताने दिली मंजूरी