Wednesday 30 May 2018

15 दिवसांत 7 जणांना ठार मारले, एका अफवेमुळे जातोय निरपराध्यांचा जीव

नॅशनल डेस्क - या गर्दीच्या तावडीत सापडला तो संपलाच. कुणाच्या हातात विटा, काहींनी उचलले दगड. चार किन्नर बेदम मार खात राहिले. मार खाता-खाता एक जमिनीवर कोसळला. तरीही लोक थांबले नाहीत. जमिनीवर पडलेले हात जोडून दयेची भीक मागत होते अन् गर्दी त्यांना लाथांनी तुडवत होती. त्या किन्नराचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना हैदराबादची आहे.
एका अफवेमुळे झाली हत्या
कुणीतरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून अफवा पसरवली की, शहरात लहान मुलांना पळवून नेणारी गँग फिरत आहे. एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यात दिसत आहे की, एका बाइकवरून दोन जण येतात आणि क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांपैकी एकाला उचलून घेऊन जातात. सोबत खेळणारी मुले मागे-मागे धावतात, परंतु किडनॅपर पळून जातात. मग आसपासचे लोक गोळा होतात आणि आरडाओरड सुरू होते. दु:खद बाब अशी की, ज्या व्हिडिओला पाहून लोकांना भडकवले जात आहे तो मुळात पाकिस्तानच्या कराची शहराचा आहे. कुण्या मुमताजने तो 2016 मध्ये अपलोड केलेला आहे. यासोबतच काही मेसेजही व्हॉट्सअॅपवर पसरवले जात आहे, ज्यात सांगण्यात येत आहे की, आपल्या मुलांना एकट्याने बाहेर जाऊ देऊ नका. आतापर्यंत 52 मुलांना किडनॅप करण्यात आलेले आहे. मुले पळवणारे उत्तर भारतीय आहेत आणि हिंदी बोलतात. याच अफवांमुळे पूर्ण आंध्रप्रदेशात भीतीचे वातावरण आहे. लोक अनोळखी व्यक्तीला पाहतात आणि त्याची चौकशी करतात. संशय येताच बेदम मारहाण सुरू होते.
15 दिवसांत अफवेमुळे 7 मर्डर
मागच्या 13 दिवसांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही असाच 4 जणांचा जीव घेण्यात आला. अफवांच्या या आगीत इतर राज्यांतही काही जीव खाक झाले. तामिळनाडूत मागच्या 15 दिवसांत अशाच 3 हत्या झालेल्या आहेत. राज्यात तिरुवन्नमलई जिल्ह्यात 65 वर्षीय रुक्मिणी आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त यासाठी मारहाण झाली, कारण त्यांनी काही मुलांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे कपडे फाडण्यात आले. कुटुंबातील 3 जण गंभीररीत्या जखमी झाले आणि रुक्मिणीचा मृत्यू झाला. यापूर्वी राज्यातील पुलिकेट परिसरात एका व्यक्तीला लहान मुले पळवणारा समजून लोकांनी एका पुलाला टांगले. ही अफवा आहे, हे सांगण्याचे पोलिस लाख प्रयत्न करताहेत, परंतु लोक मानायला तयार नाहीत.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व व्हायरल होत असेलला व्हिडिओ..
हा मेसेज होतोय व्हायरल.
हा फेक फोटो किडनॅपर म्हणून व्हायरल केला जात आहे.
हा फेक फोटो किडनॅपर म्हणून व्हायरल केला जात आहे.
Shocking: 15 दिवसांत 7 जणांना ठार मारले, एका अफवेमुळे जातोय निरपराध्यांचा जीव