Monday 18 September 2017

विद्यापीठ नामांतर मोर्चा अाज, वाहतूक मार्गात बदल; पोलिसांकडून मोठा बंदोबस्त

विद्यापीठ नामांतर मोर्चा अाज, वाहतूक मार्गात बदल; पोलिसांकडून मोठा बंदोबस्त

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार अाहे. वीरशैव व्हीजन, शिवा संघटना यांच्यासह काही संघटनांनी पाठिंबा दिला अाहे. सकाळी अकराला महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून सुरुवात होणार अाहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर होम मैदानावर जाहीर सभा होईल.

वीरशैव व्हीजन करणार मोर्चा मार्गाची स्वच्छता 
वीरशैव व्हीजनतर्फे मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी १५०० विभूती देणार असून सर्व जण विभूती लावून मोर्चात सहभागी होतील. व्हीजनचे ७० कार्यकर्ते मोर्चा मार्गावर स्वच्छता करतील. त्याकरिता हातमोजे मास्क मनोज पाटील यांनी तर महापालिकेने दोन घंटागाड्या उपलब्ध करून दिले आहेत, असे संयोजकांनी सांगितले.

मोर्चेकऱ्यांसाठी वाहनतळ व्यवस्था 
होममैदान, रंगभवन चौक मैदान, जुनी मिल कंपाउंड, महापालिका झोन क्रमांक दोन मैदान, ह.दे. शाळा पाठीमागील मैदान.

असा अाहे बंदोबस्त 
एकउपायुक्त, दोन सहायक अायुक्त, पोलिस निरीक्षक, २६ सहायक निरीक्षक, फौजदार, २६९ पोलिस, ४७ महिला पोलिस, वरूण, वज्र वाहने, क्यूअारटी अारसीपी पथक. वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी पोलिस कर्मचारी यांचा वेगळा बंदोबस्त अाहे. काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल अाहे. मोर्चा पुढे गेला की मागे वाहतूक खुली करण्यात येईल.