Monday 18 September 2017

नागरमाडी धबधब्यात बुडून 6 पर्यटकांचा मृत्यू; 3 जण बेपत्ता, अचानक पाणी वाढल्याने दुर्घटना

नागरमाडी धबधब्यात बुडून 6 पर्यटकांचा मृत्यू; 3 जण बेपत्ता, अचानक पाणी वाढल्याने दुर्घटना
झाडात अडकलेले मृतदेह.

मुंबई/पणजी- उत्तर कर्नाटकातील कारवार येथून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरमाडी धबधब्यावर साहसी पर्यटनासाठी गेलेल्या गोव्यातील पर्यटकांपैकी 6 जण बुडाले आहेत. तर 3 जण बेपत्ता आहेत.
धोकादायक पर्यटन
मान्सूनच्या काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक सहलीसाठी येतात. दक्षिण गोव्यातील मडगाव आणि वास्को येथील काही पर्यटकांचा चमु याठिकाणी सहलीसाठी गेला होता. या धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने आणि धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह गतिमान झाल्याने या पर्यटकांची धांदल उडाली आणि त्यात काही जणांचा बुडुन मृत्यू झाला आहे. कारवार येथील पोलिस आणि अग्मिशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे. या घटनेत 3 पर्यटक वाहून गेल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेत बुडालेल्यांमध्ये फ्रान्सिला पिरीस (वय 21), फियोनो पाशेको (28), रेणुका (23), मारसेलिन मिकसिका, सिधु च्यारी (21), समीर गावडे
यांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये मोर्सेलिना मेक्सिका (वय 38) यांचा समावेश आहे.