Friday, 1 September 2017
‘ब्ल्यू व्हेल हा गेम नसून धाेका अाहे. एकदा यात शिरले की बाहेर पडणे अशक्य अाहे.’ असे लिहून केली त्याने आत्महत्या
मदुराई- तामिळनाडूतील मदुराई शहरातील १९ वर्षीय युवकाचा ब्ल्यू व्हेल या गेमने बळी घेतला. बुधवारी सकाळी गळफास घेऊन त्याने अात्महत्या केली. त्याच्या हातावर ब्ल्यू व्हेल गेम पूर्ण केल्याची खूण हाेती. अात्महत्येपूर्वी चिठ्ठीत विघ्नेशने लिहिले, ‘ब्ल्यू व्हेल हा गेम नसून धाेका अाहे. एकदा यात शिरले की बाहेर पडणे अशक्य अाहे.’
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गेममध्ये विघ्नेशच्या ग्रुपमध्ये ७५ स्थानिक युवक सहभागी झालेले अाहेत. विघ्नेशच्या हातावरील खूण पाहून त्याच्याकडे अाईने विचारणा केली हाेती. मात्र ‘घाबरू नकाे, मला काही हाेणार नाही,’ असे ताे सांगत हाेता. यापूर्वी मुंबई, इंदूर शहरातही ब्ल्यू व्हेल गेमने बळी घेतले अाहेत.