Friday, 1 September 2017

शरम करा सत्ताधाऱ्यांनो - भ्रष्टाचाराच्या यादीत भारत आशिया खंडात अव्वल, पाहा पाकिस्तान कितव्या क्रमांकावर


नवी दिल्ली- जगभरातील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध करणारे फोर्ब्स नियतकालिकाने भ्रष्ट राष्ट्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात भारताचा पहिला नंबर लागला आहे. ग्लोबल सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या आकडेवारीवरुन ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो. फोर्ब्सच्या यादीनुसार भारतामध्ये लाच घेण्याचा दर 69 टक्के आहे.
टॉप 5 भ्रष्टाचारी देश
1- भारत
2 - व्हिएतनाम 
3 - थायलंड 
4 - पाकिस्तान 
5 - म्यांमार

भारतात कुठे किती भ्रष्टाचार
- फोर्ब्समध्ये प्रकाशित लेखानुसार, भारतात 6 सार्वजनिक सेवांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो. त्यात शाळा, हॉस्पिटल, ओळखपत्र तयार करण्यासाठी, पोलिस आणि मुलभूत सेवा सुविधा पुरवण्याऱ्या संस्था यामध्ये 50% पेक्षा जास्त लोकांना लाच द्यावी लागते.

मोदींवर किती विश्वास
- फोर्ब्समध्ये प्रकाशित लेखात नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे कौतूक केले आहे. त्यात म्हटले आहे. '53 टक्के जनतेला वाटते की ते चांगल्या मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण होत आहे. याशिवाय 63 टक्के लोकांना आता वाटायला लागले आहे की सामान्य माणूसही काही करु शकतो.'
पहिले कुठे होता भारत?
- बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार 2015 च्या भ्रष्टाचाराच्या इंडेक्समध्ये 168 देशांच्या यादीत भारत 76व्या क्रमांकावर होता. 
- 2014, ज्या वर्षी मोदींनी देशाचा कारभार हातात घेतला त्या वर्षी 100 देशांच्या यादीत भारत 38व्या क्रमांकावर होता