Friday, 1 September 2017

अभिनेता आफताब शिवदासानीने पुन्हा लग्न केले

बॉलिवूड अभिनेता अफताब शिवदासानी पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. तब्बल तीन वर्षानंतर त्याने पारंपारिक विवाह केला आहे. याआधी त्याने नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
कायदेशीर विवाहाच्या तब्बल तीन वर्षांनंतर त्याने नीन दुसांजशी पारंपरिक पद्धतीने लगीनगाठ बांधली. पाच जुन २०१४ मध्ये या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. आफताब-नीन हे दोघेजण नुकतेच श्रीलंकेला गेले होते. तेथील निसर्ग सौदर्याने त्यांना भुरळ घातली आणि त्यांनी पारंपारिक पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले.
श्रीलंकेतल्या तंगल्लेमधील ‘अनंतारा पीस हेवन’मध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी या दोघांचे नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. एका हत्तीवर बसून अफताब विवाहस्थळी दाखल झाला तर नीन डोलीमध्ये बसून आली.
मस्ती, लव्ह के लिए कुछ भी करेगा, ग्रँड मस्ती यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.