Wednesday, 30 May 2018

न्यायाधीशांनी टेबलाखाली लावला Camera, कळले हे सत्य- शिपाई थुंकी मिसळून पाणी पाजायचा

अलीगड, यूपी - हिमाचलच्या हमीरपूरमध्ये शिपायाद्वारे न्यायिक अधिकाऱ्याला मूत्र मिसळलेले पाणी देण्याचे प्रकरण अजून थंड झालेही नव्हते की, अलीगडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे शिपाई जज साहेबांना थुंकी मिसळून पाणी द्यायचा. न्यायाधीशांना शिपायावर आधीपासूनच संशय होता. त्यांनी Camera लावून शिपायाचे कृत्य त्यात कैद केले.