Monday, 18 September 2017
भारताचा अाॅस्ट्रेलियावर २६ धावांनी दणदणीत विजय; हार्दिक पंड्या मॅन ऑफ द मॅच
चेन्नई-युवा खेळाडू हार्दिक पांड्या (८३) अाणि यजुवेंद्र चहलने (३/३०) टीम इंडियाच्या ‘मिशन मालिका विजय’ला दमदार सुरुवात करून दिली. या युवांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर यजमान भारताने रविवारी सलामीच्या वनडेत पाहुण्या अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने घरच्या मैदानावर २६ धावांनी सामना जिंकला. यासह टीम इंडियाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा सामना २१ सप्टेंबर राेजी काेलकात्यात रंगणार अाहे. भारताचा ६०० व्या अांतरराष्ट्रीय सामन्यात २९३ वा विजय ठरला.
हार्दिक पांड्या व धाेनीच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८१ धावा काढल्या हाेत्या. मात्र, पावसाच्या व्यत्ययाने अाॅस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष गाठायचे हाेते. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १३७ धावांपर्यंत मजल मारली. यातून डीएलनुसार भारताने २६ धावांनी विजय निश्चित केला. भारताकडून यजुवेंद्र चहलने ३ गडी बाद केले. तसेच हार्दिक पांड्या अाणि कुलदीप यादवने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
यजमान भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताची घरच्या मैदानावर निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर रहाणे झटपट बाद झाला. त्यापाठाेपाठ काेहली, मनीष पांडेने अाल्यापावली पॅव्हेलियन गाठले. अाॅस्ट्रेलियाकडून नॅथन नाइल-कुल्टर चमकला. त्याने तीन विकेट घेतल्या. तसेच स्टाेईनिसने दाेन गडी बाद केले. कर्णधार विराट काेहली अाणि अजिंक्य रहाणेची निराशा झाली.
झम्पाला धू-धू धुतले
हार्दिकने अॅडमला ३८ व्या षटकादरम्यान धू- धू धुतले. त्याने यात २४ धावा काढल्या. यात एका चाैकारसह तीन षटकारांचा समावेश अाहे. याशिवाय त्याने दाेन धावा पळून काढल्या.
तिसऱ्यांदा षटकारांची हॅट््ट्रिक : हार्दिकने वनडे करिअरमध्ये तिसऱ्यांदा षटकारांच्या हॅट््ट्रिकची नाेंद केली. त्याने रविवारी अॅडम झम्पाच्या ३८ व्या षटकात सलग तीन षटकार ठाेकले. यापूर्वी त्याने चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध दाेन वेळा षटकारांची हॅट््ट्रिक केली.

धाेनीचे अर्धशतकी शतक
महेंद्रसिंग धाेनीने अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अापल्या अांतरराष्ट्रीय अर्धशतकाचे शतक झळकावले. यामध्ये वनडेतील ६६ अर्धशतकांचा समावेश अाहे. त्याच्या नावे कसाेटीत ४४ अर्धशतकांची नाेंद अाहे. त्याने आजच्या सामन्यात ७९ धावांची खेळी केली. त्याचे अाॅस्ट्रेलियाविरुद्ध हे सहावे अर्धशतक ठरले.

राॅबिनसिंगला टाकले मागे
युवा फलंदाज हार्दिकने झंझावाती खेळीच्या बळावर तुफानी अर्धशतक ठाेकले. त्याने ८३ धावांचे याेगदान दिले. यासह त्याने सातव्या स्थानावर फलदंाजी करताना टीम इंडियाकडून सर्वाधिक स्काेअरची नाेंद केली. यामध्ये त्याने राॅबिनसिंगच्या १९९९ च्या कामगिरीला मागे टाकले. राॅबिनने काेलंबाेत सातव्या स्थानावरून फलंदाजी करताना ७५ धावा काढल्या हाेत्या. अाता हार्दिकने ८३ धावांची खेळी केली.