Wednesday, 13 September 2017
गाईला झाले जुळे
गाईला जुळे होणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. आगाशी येथे एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. जुळी वासरे जन्माला येणे ही लाखातील एक घटना असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱयांचे म्हणणे आहे. जोडव्यवसाय म्हणून आगाशी येथील चंदू पाटील यांनी पाच देशी गाईंसह २० जर्सी गाई विकत घेतल्या. त्यातील एका जर्सी गाईला मंगळवारी एकावेळी दोन वासरांना जन्म दिलाय. ही दोन्ही वासरे वेगवेगळ्या रंगाची आहेत. एक १२ किलो तर दुसरे ११ किलो वजनाचे आहे. दोन्ही वासरे आणि गाय सुखरूप आहेत. गाईला सकस आहार, योग्य काळजी आणि वेळेवर औषधोपचार यामुळे दोन्ही वासरे ठणठणीत आहेत. या जर्सी गाईने याआधी मात्र दोन्ही वेळेला एका- एका वासराला जन्म दिलेला आहे.