Wednesday, 13 September 2017
'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स
13 सप्टेंबर: अॅपलनं आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन नवीन स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. तर या दोन्ही मोबाईलचे काही फिचर्स जाणून घेऊ या
आयफोन 8
- 4.7 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले
-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर,
-ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह
-12 मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा,
तसंच आयफोन 8 32 जीबी, 128जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 8च्या 32 जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 699 डॉलर्स असेल.
आयफोन 8 प्लस
-5.5 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले
-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर ,
-12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे
- कॅमेऱ्याचे f/1.8 अपर्चर
- टेलिफोटो लेन्सचं f/2.8 अपर्चर तेही डीपर पिक्सलसोबत .
याशिवाय फोर-के व्हिडीओ शूट यामधून करता येईल. तसंच अॅपल एआर किटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ऑग्युमेंटेड रिअॅलिटी अॅप्सचा यात वापर करता येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स असेल.
या दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल आणि अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.